Pages

Monday, October 6, 2025

कोजागिरी

अलवार हळवी सांज अवतरते

केशरासंगे चांदणचुरा पसरते

नभी हळूच चांदवा उमलतो

अवचित धुंद वेगळा भासतो

सागरावरी चांदवर्ख पसरतो

पुळणीचा काठ रुपेरी दिसतो

चांदणे अलगद मनात उतरते

अबोल हळवे मन हे मोहोरते

भावविभोर होतसे रंगबावरी

मनामनात जागते कोजागिरी 

मनामनात जागते कोजागिरी       

स्नेहल मोडक 

कविता

माघ पौर्णिमा

              माघ पौर्णिमा ही अध्यात्मिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. यावेळीही आम्ही चौघांनी माघी पौर्णिमेला म...