Pages

Tuesday, February 24, 2026

सुंदर

वीणेवरली करांगुली सुंदर 

कि वीणेचा झंकार अधिक सुंदर

उन पावसाचा खेळ सुंदर 

कि सप्तरंगी इंद्रधनु अधिक सुंदर 

अथांग निळा सागर सुंदर 

कि फेसाळत्या लाटा अधिक सुंदर

रिमझिम रेशीमधारा सुंदर 

कि मृदगंधी अवनी अधिक सुंदर 

रंगबिरंगी रानफुले सुंदर

कि नागमोडी पायवाट अधिक सुंदर 

नाजूक रातराणी सुंदर 

कि मधुगंधी दरवळ अधिक सुंदर 

पूर्वेचा सहस्ररश्मी सुंदर 

कि सोनवर्खी किरणे अधिक सुंदर 

शांत निरव निशा सुंदर 

कि पुनवेचे शुभ्र चांदणे अधिक सुंदर 

शब्दात गुंफले काव्य सुंदर 

कि काव्यातला तरल भाव अधिक सुंदर 

                  स्नेहल मोडक

No comments:

Post a Comment

कविता

आदि कैलास आणि ओम पर्वत - २

           २४ तारखेला सकाळी लवकरच आम्ही प्रवासाला सुरुवात केली. या दिवशी आम्ही ज्या दर्शनासाठी आसुसलेले होतो ते दर्शन घेण्यासाठी आम्ही निघा...