मन दोन अक्षरी अगदी ईवलासा शब्द पण त्याची
व्याप्ती मात्र अमर्याद.
मनाचे व्यापार सहजासहजी कळत नाहीत हे मात्र अगदी खरं. कधी हसू तर कधी आसू,
कधी
आतुर तर कधी होते कातर. अगदी एका क्षणात कुठल्याकुठे पोहोचते मन.चंचल मन आवरायला
साधनाच करावी लागते.
बघा ना, मी हे लिहित असताना माझं मन मात्र तुमच्याजवळ
पोचलंय. मनाचे हेच अनोखे विभ्रम मी काव्यात गुंफले आहेत.
आवडेल ना तुम्हाला...?
मन पाखरू पाखरू त्याला कसे आवरु
क्षणात जाय उंच आभाळा
होऊनी पतंग नीळा
क्षणात फुलावरी लागे भिरभिरु
होऊनी रंगीत फुलपाखरू
क्षणात होई नभीचे इंद्रधनू
होऊनी सप्तरंगी तनू
क्षणात डोलवी आसमंत सारा
होऊनी खट्याळ वारा
क्षणात होई निर्झर खळाळते
होऊनी पाणी शुभ्र फेसाळते
क्षणात
कातर क्षणात आतुर
होऊनी
हळवे माजते काहूर
क्षणात फिरे मुक्त दशदिशात
कळेना कसे ठेवू बंधनात
मन
पाखरू पाखरू त्याला कसे आवरु
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment