प्राजक्त असा नुसता शब्द जरी ऐकू आला तरी लगेच आपल्या नजरेसमोर येतं ते पारिजातकाचं नाजूक फुल, आणि होते त्याच्या मधुगंधाची आठवण.
तिन्हिसांज सरुन निषेचा अंधार गडद होत असतानाच प्राजक्ताची फुलं अलवार उमलू लागतात अन मधुगंधाची उधळण करत सारा आसमंत धुंद करतात. ऊष:काली या फुलांची पखरण धरतीवर करुन हे झाड रिक्त होतं ते पुन्हा फुलण्यासाठीच.
अंगणी माझिया सुरेख पारिजात फुलतो
पहाटसमयी पखरण गंधकेशराची करतो
अलवार हाती मी फुले वेचिते
रचुनी विविध कल्पना साकारते
पाहता मोहक रचना मन सुखावते
अन सुंदर सकाळ सुगंधीत होते
मांडते चित्रण मी साकार कल्पनांचे
सुगंधी व्हावे क्षण आपणा सर्वांचे
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment