शब्द नुसता वाचूनच डोळ्यासमोर आलं ना आपल्या घरातलं कपाट. प्रत्येक घरात एक तरी मजबूत लोखंडी कपाट असतंच, हो ना? अर्थात त्याबरोबरच लाकडी कपाटंही असतातच घरात. आपल्या साऱ्या चीजवस्तू , कागदपत्रं नीट ठेवण्यासाठी गरजच असते कपाटाची. गरजेनुसार अनेक लहानमोठे कप्पे असलेली कपाटं असतात आपल्याकडे. पण आज मला एका वेगळ्याच कपाटाबद्दल बोलायचंय.
मनाचं कपाट. हो अगदी बरोबर मनाचं कपाट. आपल्या मनातही भावभावनांचे असंख्य कप्पे असतात. कुटुंब, आप्तेष्ट, मित्रपरिवार या सगळ्यांसाठीही वेगवेगळे कप्पे असतात आपल्या मनात. सुखद, हळव्या, हव्याहव्याशा आठवणी एका कप्प्यात तर दु:खद, नकोशा आठवणी एका कप्प्यात ठेवतो आपण. पण घरातली कपाटं जशी आपण वेळोवेळी आवरुन नीट ठेवत असतो, निरुपयोगी वस्तू काढून टाकतो अगदी तसंच मनाचं कपाटही वेळोवेळी आवरावं लागतं. त्रासदायक भावना विसराव्या लागतात. त्यासाठी आपल्या माणसांजवळ हक्कानं व्यक्त व्हावं लागतं. मनमोकळ बोलूनच आपण तणावमुक्त होत असतो.
आपल्या मनातलेअदृश्य जगातले
असंख्य कप्पे असलेलेभावभावनांनी भरलेले
एक कप्पा कुटुंबाचाप्रेम अन काळजीचा
एक कप्पा नात्याचाप्रेम अन आधाराचा
एक कप्पा परिचितांचासाथ अन मदतीचा
एक कप्पा मैत्रीचानिखळ आनंदाचा
एक कप्पा स्वतः चाआवड अन छंदाचा
मनाचे कपाट कधी भरुन वाहतेसावरणारे कुणीतरी समोर लागते
कधी भरलेले कपाट बंद होतेआतल्याआत तडफडत राहते
होता भावनांचा असह्य भारउद्वेगाने होतो मग देहावर वार
एका क्षणात एखादं आयुष्य संपतंआठवणीत जगणं एवढं बाकी उरतं
असंख्य भावबंध असलेलेनिरंतर मनातच जपलेले
हे कपाट नित्यनेमाने उघडायचेव्यक्त होऊनी सहजमुक्त जगायचे
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment