पाचूच्या सुंदर रानात
लालबुंद पाऊलवाट
स्तब्ध तळ्याकाठी
थबकते पाऊलवाट
कधी घनदाट वनात
फिरते ती पाऊलवाट
परि जीर्ण पाचोळ्यात
लुप्त होते पाऊलवाट
मनातल्या राज्यातही
असते एक पाऊलवाट
स्वप्नांच्या दुनियेतही
फिरविते पाऊलवाट
सुखाच्या झुल्यावरती
पोहोचवते पाऊलवाट
एकांतातही साथ देते
आठवांची पाऊलवाट
भावनांच्या आवर्तात
हरवते ती पाऊलवाट
हरवते ती पाऊलवाट
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment