झुळूक वाऱ्याची मनास स्पर्शते
सुरेल धून मुरलीची कानी वाजते
कधी झुळूक लाटांवर स्वार होते
शुभ्र फेसाळती फुले देऊन जाते
कधी झुळूक तरुवेलींवर झुलते
क्षणात आसमंत मधुगंधीत होते
झुळूक अलगद अवकाशी फिरते
आठवांचा पाऊस बरसूनी जाते
फुलपाखरासम झुळूक भिरभिरते
क्षणभर सौख्य देत सतत फिरते
झुळूक कातरवेळी अलगद येते
हळवी अबोल साथ मजला देते
झुळूक वाऱ्याची मनास स्पर्शते
सुरेल धुन मुरलीची कानी वाजते
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment