लेऊन पंख कागदी मन उडत जाय रे
जिथे ना जायचे तिथेच ते जाय रे
वीण आयुष्याच्या वस्त्राची कळली ना रे
मनीची मोहमाया अजूनी सरली ना रे
ऐके ना थांबे ना उडत जाय रे
किती हे वेडं मन रे
तोडूनी बंध सारे मन क्षणात दूर पोचते
अन स्व्प्नचित्र जणू खरेच भासते
इथेतिथे वरखाली पुन्हा पुन्हा फिरते हे
मन असे जणू स्वच्छंद विहग हे
ऐके ना थांबे ना उडत जाय रे
किती हे वेडं मन रे
चंचल मन ते भावस्वप्नी सहज रमते
आठवांचे मधुकण अलवार टिपते
रानफुलावरच्या दवांत भिजते
मन जणू फुलपाखरू होते
ऐके ना थांबे ना उडत जाय रे
किती हे वेडं मन रे
लेऊनी पंख कागदी मन उडत जाय रे
जिथे ना जायचे तिथेच ते जाय रे
ऐके ना थांबे ना उडत जाय रे
किती हे वेडं मन रे
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment