काजळ निशेचे फिकट जाहले
झुंजूमुंजू झाले ग झुंजूमुंजू झाले
झुंजूमुंजू झाले ग झुंजूमुंजू झाले
घरट्यातूनी सारे विहग जागले
किलबिलाटे सृष्टीस जागविलेपहाटवारा शीतल झुळकला
आसमंत अवघा शिरशिरला
पूर्वेस किंचित केशर उजळले
कुजन कोकिळेचे सुरु जाहलेरविराज आकाशी अवतरले
सोनकिरण सृष्टीवर पसरले
चराचर अवघे जागे जाहले
पहाटवारा पिऊनी सुखावले
पहाटवारा पिऊनी सुखावले
स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment