खरंच आयुष्य जर एक पुस्तक असतं
सारं कथानक आधीच वाचलं असतं
क्षण सुखाचे वेचले असते अलवार
अन दु:ख सावरलं असतं हळूवार
फाडली असती पानं अश्रू भरली
जोडली असती पानं मोद भरली
जमला असता ताळमेळ सहजतेनं
किती जोडले किती तोडले स्वभावानं
उलटली असती पुन्हा काही पानं
सजवली असती पुन्हा जुनी स्वप्नं
जपलं असतं बंधन रेशमी नात्यांचं
अन विणलं असतं वस्त्र खास मैत्रीचं
नसतं कथानक जरी मनासारखं
केलं असतं मन निर्लेप अळवासारखं
खरंच आयुष्य जर एक पुस्तक असतं
सारं कथानक आधीच वाचलं असतं
स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment