बघता बघता अजून एक वर्ष सरले
कुणास ठाऊक कलियुग किती उरले
सरत्या वर्षात सारे जुने मैत्र दुरावले
परि जीवनप्रवासात नवे स्नेह जुळले
सुखाचे कधी दुःखाचे पारडे जड झाले
विसरुन वेदना त्या मन निर्विकार बनले
बऱ्या वाईट अनुभवांचे चित्र रंगले
भविष्याचे सप्तरंग नजरेत सामावले
खोल घाव किती काळजावरी जाहले
सरला काळ अन हळवे मन सावरले
कालचक्र फिरले वर्ष एक आले गेले
नववर्ष स्वागता मन पुन्हा सिध्द झाले
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment