Pages

Sunday, August 23, 2026

वळणवाट

नव्या वाटा नवी वळणे

रोज नव्याने जगणे

भूतकाळाचे चित्र गहिरे

भविष्याचे स्वप्न साजिरे

सोडून रोजची वहिवाट 

येते पुढे वळणवाट

धरले काही हात सुटती

बंध नव्याने जुळती

लागता वळणाची चाहूल 

अडखळते मग पाऊल

अशक्य असे परि थांबणे

सोडून सारे पुढे चालणे

नवी स्वप्ने नव्या आशा

वळणावरी नवी दिशा

आठवासंगे पुढे वळावे

जगणेच गाणे व्हावे

जगणेच गाणे व्हावे 

        स्नेहल मोडक      

कविता

वळणवाट

नव्या वाटा नवी वळणे रोज नव्याने जगणे भूतकाळाचे चित्र गहिरे भविष्याचे स्वप्न साजिरे सोडून रोजची वहिवाट  येते पुढे वळणवाट धरले ...