नव्या वाटा नवी वळणे
रोज नव्याने जगणे
भूतकाळाचे चित्र गहिरे
भविष्याचे स्वप्न साजिरे
सोडून रोजची वहिवाट
येते पुढे वळणवाट
धरले काही हात सुटती
बंध नव्याने जुळती
लागता वळणाची चाहूल
अडखळते मग पाऊल
अशक्य असे परि थांबणे
सोडून सारे पुढे चालणे
नवी स्वप्ने नव्या आशा
वळणावरी नवी दिशा
आठवासंगे पुढे वळावे
जगणेच गाणे व्हावे
जगणेच गाणे व्हावे
स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment