Pages

Wednesday, June 17, 2026

स्वप्न

पहाटसमयी नभांगणी

दाटती मेघ सावळे

सुखावते हे मन

जणू होते बावळे

दिसेल वीजेची रेघ

क्षणभर लखलखेल

जणू ताशा वाजेल

अन कडाडतील मेघ

बरसतील जलधारा 

चिंब भिजेल अवनी

मृदगंध दरवळेल

गंधाळेल धुंद वारा

आसुसलेलं हे मन

पावसाची वाट पहातं

पण हळूच मेघ विरतात

आकाश लख्ख होतं

दिवसाउजेडातलं स्वप्न 

कृष्णमेघातच विरतं

वैशाखवणव्याची झळ

तनमन सोसत रहातं

- स्नेहल मोडक

कविता

श्रावण - दर्शन

               ' अधिकस्य अधिक फलम् ' म्हणजे हिंदू पंचांगानुसार दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक महिन्यात केलं जाणारं नामस्मरण, जपत...