सरेल अजून एक वर्ष पाऊलखुणा ठेवत
येईल नववर्ष आगमनाचा जल्लोष करत
काय सरलं काय उरलं मनातच स्मरुया
अन संकल्प नववर्षाचा मनाशी करुया
वस्त्र रेशमी नात्यांचं उसवलं जर किंचित
प्रेमधाग्यात गुंफून पुन्हा जुळवूया संचित
विसरुन क्षण दुःख अन क्लेशाचे सगळे
नववर्षात करुया साजरे सुखाचे सोहळे
पुन्हा एकदा नवी आशा नवी स्वप्नं पाहुया
नवी नाती नवी मैत्री उत्साहानंच जोडूया
दुःख वेदनांचे घाव सोसले सरत्या वर्षात
सौख्य आनंदाचे क्षण वेचुया नव्या वर्षात
देऊया निरोप मूकपणाने सरत्या वर्षाला
अन सज्ज होऊया नववर्षाच्या स्वागताला
स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment